Namdev Gharal
नेदरलँडमध्ये सध्या वसंत ऋतूचे आगमन झाले असून जगप्रसिद्ध ट्युलीप फुलांचा हंगाम दिमाखात सुरू झाला आहे
जगातील सर्वात मोठी फुलांची बाग 'कुकनहॉफ' १९ मार्चपासून पर्यटकांसाठी खुली झाली आहे. येथे तब्बल ७० लाखांहून अधिक फुले लावली जातात
लाल, पिवळा, जांभळा, पांढरा आणि गुलाबी... ट्युलीपच्या शेकडो प्रजातींमुळे जणू जमिनीवर रंगांचा गालिचा पसरल्यासारखा भासतो
तुम्हाला माहित आहे का? ट्युलीपचे मूळ नेदरलँड नसून ते प्रामुख्याने मध्य आशिया आणि तुर्कीमधून युरोपात पोहोचले आहेत
ट्युलीपचा पूर्ण बहर पाहण्यासाठी १५ एप्रिल ते ५ मे हा काळ सर्वात उत्तम असतो. १० मे २०२६ रोजी हा हंगाम संपणार आहे
सिंगल अर्ली, डबल लेट, पॅरट ट्युलीप आणि फ्रिंज्ड ट्युलीप अशा अनेक मनमोहक आकारात ही फुले पाहायला मिळतात
दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक केवळ या फुलांच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी नेदरलँडला भेट देतात.
या हंगामात केवळ बागाच नव्हे, तर ग्रामीण भागातील ट्युलीपची शेते (Tulip Fields) सुद्धा पर्यटकांचे मन मोहून घेतात.
एप्रिलच्या सुरुवातीला बागेत सुरुवातीच्या प्रजातींचे ट्युलीप आणि डॅफोडिल्स (Daffodils) फुलायला सुरुवात झाली आहे.
जसा एप्रिल महिना पुढे जाईल, तसा फुलांचा बहर आणखी वाढत जाईल.
शेतांच्या शेतात पसरलेले ट्युलीपचे रंगीबेरंगी गालिचे पाहायचे असतील, तर एप्रिलचा दुसरा पंधरवडा ते मेचा पहिला आठवडा ही सर्वात उत्तम वेळ मानली जाते.