Nepal: नेपाळ भारताचा भाग होणार होता? पण नेहरूंनी... ७५ वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

मोहन कारंडे

आज नेपाळ एक स्वतंत्र देश आहे, पण ७५ वर्षांपूर्वी तो भारताचा भाग बनू शकला असता.

१९५१ मध्ये नेपाळचे राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता.

जागतिक परिस्थिती लक्षात घेता नेपाळचे भारतात विलीनीकरण व्हावे अशी नेपाळच्या राजाची इच्छा होती.

नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांचा प्रस्ताव नेहरू यांनी नाकारला होता. त्यांना वाटले की नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहावे.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे.

प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, 'राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेहरूंना नेपाळचे भारतात विलीनीकरण करून त्याला देशातील एक प्रांत बनवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु तत्कालीन पंतप्रधानांनी तो प्रस्ताव फेटाळला.'

'जर नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी ही संधी सोडली नसती. जसे इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने सिक्कीमचे भारतात विलीनीकरण केले, त्याचप्रमाणे त्यांनी नेपाळच्या प्रस्तावाचाही स्वीकार केला असता,' असे त्यांचे मत आहे.