Neelakurinji : 12 वर्षातून एकदाच फूलणारे फूल, निलगीरी पर्वताचे नावही याच फुलावरुन!

पुढारी वृत्तसेवा

तामिळनाडू व केरळच्या सिमेवर असलेला पश्चिम घाटातील पर्वत म्हणजे निलगिरी, या पर्वताचे नाव याच ठिकाणी फुलणाऱ्या एका निळ्या रंगाच्या फूलावरुन पडले आहे

हे फूल म्हणजे नीलकुरिंजी, याचे वैशिष्ट्ये म्हणजे हे फूल १२ वर्षातून एकदाच फूलते १२ वर्षांनंतर एकदाच प्रचंड प्रमाणावर फुलोरा येतो, बीजनिर्मिती होते आणि त्यानंतर ही मूळ वनस्पती सुकून नष्ट होते.

पडलेल्या बियांपासून नवीन रोपे तयार होऊन पुढील १२ वर्षांचे चक्र सुरू होते. परत पुढच्या १२ वर्षांनतर ही लाखोंच्या संख्येत फूले फुलतात व निळ्या रंगानी डोंगर फूलून जातात.

लांबून पाहिल्यास संपूर्ण डोंगररांग निळसर-जांभळ्या रंगाच्या मखमली चादरेने झाकल्यासारखी दिसते. या अथांग निळ्या दृश्यावरूनच प्राचीन काळापासून या संपूर्ण पर्वतरांगेला 'नीलगिरी' (Blue Mountains) हे नाव मिळाले.

केरळमधील मुन्नार (इरविकुलम राष्ट्रीय उद्यान), तमिळनाडूतील निलगिरी पर्वतरांग आणि कर्नाटकातील काही उंच डोंगरभागांत याचा बहर पाहायला मिळतो.

निलगिरीतील स्थानिक 'मुथुवान' आणि 'तोडा' या आदिवासी जमाती या फुलाच्या बहरावरून आपले वय मोजण्यासाठी आणि कालगणनेसाठी याचा संदर्भ घेत असत.

पूर्वी कॅलेंडर किंवा घड्याळ नसताना स्थानिक आदिवासी लोक आपले वय मोजण्यासाठी या फुलांचा वापर करत. "मी माझ्या आयुष्यात ३ वेळा किंवा ४ वेळा कुरिंजीचा बहर पाहिला आहे", यावरून ते स्वतःचे वय (उदा. ३ बहर = साधारण ३६ वर्षे) सांगत.

कुरिंजी मध: या फुलांच्या हंगामात मधमाशा मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. या फुलांच्या रसापासून बनवलेला मध हा अत्यंत औषधी, गडद आणि चविष्ट मानला जातो.

स्थानिक लोकसाहित्यात, प्रेमकथांमध्ये आणि सणांमध्ये निलगिरी पर्वतावरील या बहराला समृद्धीचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते.