Neck Pain Relief : स्क्रीन टाईममुळे मान दुखतेय? 'या' ५ सोप्या ट्रिक्स देतील आराम!

पुढारी वृत्तसेवा

दिवसभर लॅपटॉप आणि स्मार्टफोन पाहण्‍यासाठी झुकल्यामुळे मानेवर तब्बल २७ किलोचा भार पडतो.

सरळ उभे असताना डोक्याचे वजन ५.४ किलो असते, पण खाली वाकल्यास मानेवरील ताण तब्बल ५ पट वाढतो!

मानेला आराम मिळण्‍यासाठी मधूनमधून ब्रेक घेणे. तसेच मानेची हालचाल करत राहणे हाच उत्तम उपाय आहे.

बसून किंवा झोपून हळूवारपणे डावीकडे आणि उजवीकडे पहा. त्यामुळे मानेचे स्नायू मोकळे होतात.

काम करताना मान सरळ आणि खांदे रिलॅक्स ठेवा. हनुवटी खूप समोर ढकलणे टाळा.

मान वर उचलून हनुवटी किंचित आत घ्या. खांदे मागे-खाली ओढा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.

पाठीवर झोपून हनुवटी छातीकडे घ्या आणि डोके १ इंच वर उचलून धरा. यामुळे मानेला ताकद मिळते.

हेडरेस्ट असलेल्या खुर्चीवर बसून डोके मागे दाबा.

महत्‍वाची टीप : कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

येथे क्‍लिक करा.