पुढारी वृत्तसेवा
मत्स्य : भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण करून महापुरापासून मानवजातीला वाचवले.
कूर्म : दुसरा अवतार कूर्म अवतार, समुद्र मंथनावेळी विष्णुने कूर्म अवतार धारण करून मंद्रल पर्वत पाठिवर स्थिर केला.
वराह : विष्णुने तिसरा वराहचा अवतार धारण करून पृथ्वीला वाचवले होते.
नरसिंह : अर्धे मनुष्य आणि अर्धा सिंह. या अवतारात विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला.
वामन : बटू ब्राह्मणाच्या रूपात वामन अवतारात विष्णूने राजा बळीकडून पृथ्वीचे तीन पाऊल जमीन दान मागितली.
परशुराम : भगवान विष्णूंनी सहावा अवतार परशुरामाचा अवतार घेतला.
राम : विष्णुने श्री रामाचा अवतार घेउन रावनाचा वध केला.
कृष्ण : महाभारतातील एक प्रमुख व्यक्ती, ज्याने अर्जुनाला भगवतगीतेचा उपदेश दिला.
कल्की : हा अंतिम अवतार मानला जातो, जो कलीयुगाच्या शेवटी पृथ्वीवर अवतरेल असे मानले जाते. जेंव्हा पाप जास्त वाढेल तेंव्हा त्याचा नाश करण्यासाठी हा अवतार घेतला जाईल.