पोटाच्या मध्यभागी किंवा बेंबीच्या आसपास होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. जाणून घ्या याची मुख्य कारणे..काही वेळा जास्त शारीरिक हालचाली किंवा अचानक जड वस्तू उचलल्यामुळे नाभीच्या वरील स्नायूंवर ताण येतो आणि वेदना सुरू होतात..नाभीभोवती होणाऱ्या वेदना हे मूतखड्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. सुरुवातीला या वेदना कमी तीव्रतेच्या असतात..जर खड्याचा आकार वाढत गेला, तर या वेदना इतक्या तीव्र होतात की रुग्ण अक्षरशः जमिनीवर लोळू लागतो..बेंबीच्या आसपास सतत दुखत असेल, तर हे पोटात झालेल्या एखाद्या संसर्गाचे लक्षण असू शकते..अशा प्रकारच्या लक्षणांमुळे अॅसिडिटी किंवा 'गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स' सारखे आजार होण्याची शक्यता वाढते..जर वेदना नाभीभोवती सुरू होऊन पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला पसरत असतील, तर ते 'अपेंडिसाइटिस' असू शकते..पोटावर अचानक दाब पडल्यामुळे दुखत असेल, तर गरम पाण्याने शेक घेतल्यास आराम मिळू शकतो..जर १-२ दिवसांपेक्षा जास्त काळ सतत वेदना होत असतील, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांना भेटा.