Navduraga|नवदुर्गांचे दर्शन घ्‍या एका क्‍लिकवर

Namdev Gharal

शैलपुत्री – पर्वतराज हिमालयाची कन्या, वृषभावर आरूढ. - दुर्गेचे पहिले दिव्य रूप शैलपुत्री आहे. शैल म्हणजे शिखर

ब्रह्मचारिणी – तपश्चर्या करणारी, जपमाळ व कमंडलू धारण केलेली. - ब्रह्मचारिणी म्हणजे जे अनंत आहे, अनंतात अस्तित्वात आहे, गतिमान आहे. अशी ऊर्जा जी जड किंवा निष्क्रिय नाही, तर जी अनंतात गतिमान आहे.

चंद्रघंटा – कपाळावर अर्धचंद्र, वाघावर आरूढ. चंद्र आपल्या मनाचे प्रतीक आहे. मनाचे स्वतःचे चढ-उतार असतात. बऱ्याचदा मनात संघर्ष सुरु असतो. अशावेळी मनाला शांतता देणारी देवी

कुष्मांडा – ब्रह्मांडाची सृष्टी करणारी देवी. देवीचे चौथे रूप, कुष्‍म म्‍हणजे भोपळा, गोलाकार आहे. म्हणून येथे ते जीवनशक्तीचा संदर्भ देते - जीवनशक्ती जी पूर्ण, गोलाकार, वर्तुळासारखी असते.

स्कंदमाता – कुमार कार्तिकेयची माता, सिंहावर आरूढ. देवीचे पाचवे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. भगवान कार्तिकेय यांना स्कंद असेही म्हणतात, हे नाव ज्ञान आणि कर्म दोन्ही दर्शवते.

कात्यायनी – महिषासुरमर्दिनी रूप, सिंहावर आरूढ. आपण जे जग म्हणून पाहतो ते आपल्याला दृश्यमान असेलच असे नाही. जे अदृश्य आहे जे आपल्या इंद्रियांना कळू शकत नाही असे रुप धारण केलेली.

कालरात्रि – क्रोधरूप, काळ्या वर्णाची, राक्षसांचा संहार करणारी, हे मातृदेवतेचे सर्वात भयंकर रूप आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये यापेक्षा भयानक रूप दुसरे नाही. तरीही हे रूप मातृत्वाला समर्पित आहे.

महागौरी – शुभ्र, शांत व पवित्र स्वरूप. महागौरी म्हणजे सौंदर्याने परिपूर्ण, तेजस्वी पूर्णपणे सौंदर्यात बुडलेले असे रूप.शांत पूर्णपणे दयाळू, हे असे रूप आहे जे सर्व इच्छा पूर्ण करते.

सिद्धिदात्री – सिद्धी व शक्ती प्रदान करणारी देवी. सिद्धिदात्री माता तुम्हाला असाधारण सिद्धी प्रदान करते, सर्वकाही परिपूर्णतेने पूर्ण करण्याची क्षमता, अस्तित्वाची परिपूर्णता.