Beauty tips: आयब्रोला दाट आणि आकर्षक बनवण्याचा घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा

सुंदर आणि दाट आयब्रो (भुवया) तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात आणि तुमचा मेकअप अधिक आकर्षक दिसतो.

अनेक महिलांना आयब्रो पातळ किंवा विरळ असण्याची समस्या असते. अशा वेळी महिला आयब्रो पेन्सिल वापरून त्या भरतात.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून, आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयब्रो कायमच्या दाट होतील.

एका लहान वाटीत एरंडेल तेल घ्या.

त्यात थोडे बदाम तेल आणि अद्रकाचा रस मिसळा.

हे तिन्ही जिन्नस चांगले मिसळून एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुमच्या आयब्रोवर (भुवयांवर) लावा.

हा उपाय फक्त एका महिन्यात वापरून बघा.

तुम्हाला तुमच्या आयब्रोमध्ये झालेला फरक स्पष्टपणे दिसेल आणि त्या दाट होतील!