National Mango Day : आंब्यापासून खास बनवा 'हे' १५ चविष्ट पदार्थ

अनुराधा कोरवी

३ कच्च्या कैरी, १ कप गूळ, पाव चमचा वेलदोडे पावडर, मीठ, पाणी वापरून कच्च्या कैरीपासून पन्हे घरीच बनवा. 

हापूस आंबा, १ कप रवा, ४ चमचा तेल, मीठ, अर्धा कप साखर, अर्धा कप दुध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व्हॅनिला इसेन्स इ. साहित्य वापरून मॅगो केक बनवा.  

कच्चे आंबे २, तेल एक वाटी, हिंग, मीठ, हळद१ चमचा, बडीशेप, मेथी दाणे, मोहरी, लाल तिखट इ. साहित्य वापरून घरीच बनवा चटपटीत आंब्याचे लोणचे. 

२ मोठ्या पिकलेल्या आंब्याचा रस, २ चमचे साखर, १ चमचा वेलदोडे पावडर, १ कप गोड दही वापरून घरीच आंबा लस्सी बनवा.

आंब्याचा रस, १ कप दूध, २ चमचे कॉर्न फ्लोअर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, १ कप साखर वापरून मॅगो आईस्क्रिम बनवा.

कैरी १, कांदा १, गूळ - २ चमचा, शेंगदाण्याचा कूट २ चमचा,  मोहरी, जीरे, हिंग, मीठ, लाल तिखट, तेल इ. साहित्य वापरून कैरी कांदा चटणी घरीच बनवा. 

आब्यांचा रस, साखर, आईस्क्रीम, दुध, बर्फ, काजू, बदाम, पिस्ता इ. साहित्य एकत्रित मिक्स करून मुलांसाठी मॅगो मिल्कशेक बनवा.

कैरीचा किस १ वाटी, साखर- गुळ १ वाटी, तूप १ चमचा, वेलदोडे ३, दालचिनी, लवंग, केशर इ. साहीत्य वापरून पूर्ण वर्षभरासाठी मुरांबा बनवा.

गव्हाचे पीठ २ कप, बेसन पीठ १ कप, आंब्याचा रस ३ कप, साखर, तूप, मीठ, तळण्यासाठी तेल वापरून आंबा पुरी बनवा.

२ कप दही , आंबाचा रस ४ चमचे, साखर, केसर, दूध, वेलदोडे पावडर अर्धा चमचा, बारीक केलेले ड्रायफ्रूड इ. साहीत्य वापरून आम्रखंड बनवावे.

३ वाटी आब्यांचा रस, वेलची पूड आणि साखर एकत्रित करून  त्यानंतर आपण पुरणाची पोळी बनवतो तशी पोळी बनवून द्यावी.   

२ पिकलेल्या आंब्याचा रस, २ केळी, ४ वाटी दुध, ४ मोठे चमचे साखर घालून खमंग आंबा -केळी शिकरण घरीच मुलांसाठी बनवा.  

१ वाटी पिकलेल्या आंब्याचा रस, १ वाटी साखर, १ वाटी दूध, पिठी साखर थोडीशी, वेलदोडे पावडर इ, साहित्यांनी आंबा वडी बनवा. 

दोन स्लाईस ब्रेड, अर्धा कप क्रिम, ४ फोडी आब्यांचा रस, १ चमचा साखर, मॅगो पुरी २ चमचा, वेलदोडे पावडर इ. साहित्यांनी मॅगो सॅडविच बनवा.   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here