Namdev Gharal
आपल्या रोजच्या जगण्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे ‘नेल कटर’ या छोट्या साधनाचा इतिहास खूप रंजक आहे
नेल कटरचा शोध लागण्यापूर्वी लोक नखे कापण्यासाठी धारदार दगड, छोटे चाकू किंवा वस्तऱ्याचा वापर करत असत.
अनेकदा नखे दगडावर घासून लहान केली जायची. श्रीमंत लोक नखे कापण्यासाठी लहान कात्री वापरत असत.
नेल कटरच्या आधुनिक स्वरूपाचा पहिला पेटंट व्हॅलेंटाईन फॉगर्टी या अमेरिकन व्यक्तीने २४ फेब्रुवारी १८७५ रोजी नोंदवला. मात्र, त्यांचे हे साधन आजच्या नेल कटरपेक्षा थोडे वेगळे होते
आज आपण जे 'क्लॅम्प' स्टाईल नेल कटर पाहतो, त्याच्या जवळ जाणारे डिझाइन युजीन हॅम (Eugene Heim) आणि सेलेस्टिन मॅट्झ (Celestin Matz) यांनी १८८१ मध्ये विकसित केले.
चॅपेल कार्टर (Chapel S. Carter) यांनी १९०५ मध्ये नेल कटरमध्ये काही सुधारणा केल्या. त्यांनी याला अधिक सुटसुटीत बनवले.
पुढे त्यांच्या कंपनीने (H.C. Cook Co.) मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन सुरू केले, ज्यामुळे नेल कटर घराघरात पोहोचले. यामूळे नखे कापणे अधिक सुरक्षित बनले
१९४७ मध्ये विल्यम बॅसेट (William Bassett) यांनी 'Trim' नावाचा ब्रँड सुरू केला. त्यांनी नेल कटरचे डिझाइन अधिक आधुनिक केले.
त्यात 'जॉ स्टाईल' (Jaw-style) आणली आणि वरचा भाग गोल फिरवता येईल अशी सोय केली. हेच नेल कटर आज आपण सर्वाधिक वापरतो.