Musk Deer : कस्तृरी मृगाच्या नाभीतून सुंगध कसा येतो, काय आहेत या सुगंधाची वैशिष्ट्ये!

Namdev Gharal

कस्तुरी मृग (Musk Deer) हा निसर्गातील एक अत्यंत दुर्मिळ, लाजाळू आणि वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. 'कस्तुरी' या अत्यंत मौल्यवान सुगंधी द्रव्यामुळे हा प्राणी प्राचीन काळापासून जगभर प्रसिद्ध आहे.

कस्तुरी मृग प्रामुख्याने आशिया खंडातील उंच पर्वतीय भागांत आढळतात. भारतामध्ये हिमालयाच्या रांगांमध्ये (त्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, तसेच भूतान, तिबेट, चीन सिक्कीम या ठिकाणीच आढळते

कस्तुरी ग्रंथी (Musk Pod): कस्तृरी ही फक्त नरामध्येच तयार होते. नर मृगाच्या पोटाच्या खालच्या भागात (नाभीजवळ) त्वचेखाली एक लहान पिशवीसारखी ग्रंथी असते, तिला 'कस्तुरी ग्रंथी' किंवा 'मस्क पॉड' म्हणतात.

वयात आल्यानंतर नराच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे या ग्रंथीतून एक प्रकारचा दाट, तपकिरी-लालसर स्राव बाहेर पडतो. सुरुवातीला या स्रावाचा वास अत्यंत उग्र आणि नकोसा असतो.

मात्र, हा स्राव हवेच्या संपर्कात येऊन सुकल्यानंतर त्यातील 'मस्कोन' (Muscone) नावाच्या रासायनिक संयुगामुळे त्याला एक अत्यंत मोहक, गोडसर आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध प्राप्त होतो.

कस्तुरीचा सर्वात मोठा वापर उच्च दर्जाची आणि महागडी अत्तरे बनवण्यासाठी केला जातो. कस्तुरीमध्ये इतर सुगंधांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचा अद्भुत गुणधर्म असतो.

नैसर्गिक कस्तुरी (Natural Musk) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यापेक्षाही महाग असण्यामागे तिची दुर्मिळता, मिळवण्याची कठीण प्रक्रिया आणि तिचे अद्वितीय रासायनिक गुणधर्म ही मुख्य कारणे आहेत

एका पूर्ण वाढ झालेल्या नर मृगाच्या ग्रंथीमधून वर्षभरात सरासरी फक्त २५ ते ३० ग्रॅम (साधारण दोन ते तीन चमचे) इतकीच कस्तुरी मिळते.

अत्तराचा एक थेंब कपड्यावर किंवा त्वचेवर लावल्यास त्याचा सुगंध कित्येक दिवस टिकून राहतो. नैसर्गिकरीत्या असा गुणधर्म देणारे दुसरे कोणतेही द्रव्य निसर्गात सहज उपलब्ध नाही.

त्यांचा स्वभाव अतिशय लाजाळू असतो आणि ते प्रामुख्याने रात्रीच्या वेळी किंवा पहाटे बाहेर पडतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण असते.