Music and Memories | गाण्यांमध्ये काय असते जादू : आठवणी का होतात ताज्या!

Namdev Gharal

संगीत आणी मानवाचे खूप जून नाते आहे एखादे जुने गाणे कानावर पडले की आपण अचानक भूतकाळात हरवतो. हे केवळ योगायोग नसून यामागे मेंदूचे मोठे विज्ञान दडलेले आहे.

प्राचिन काळापासून मानव हा संगीताचा दिवाना आहे. इतर कोणत्‍याही कला प्रकारापेक्षा संगीत हे मानवाच्या भावनांशी अधिक जोडलेले आहे.

जेव्हा आपण आवडीचे गाणे ऐकतो, तेव्हा मेंदूत 'डोपामाइन' (Dopamine) नावाचे न्यूरोट्रांसमीटर स्त्रवते याला 'फील गुड' हार्मोन म्हणतात, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि मन प्रसन्न होते.

संगीत ऐकताना मेंदूचा 'हिप्पोकॅम्पस' (Hippocampus) हा भाग प्रामुख्याने कार्य करतो. हा भाग आपल्या दीर्घकालीन आठवणी साठवण्याचे केंद्र आहे.

गाण्यांशी जोडलेल्या भावना जाग्या करण्याचे काम मेंदूतील 'अमिग्डाला' (Amygdala) हा भाग करतो. एखाद्या गाण्यासोबत जोडलेला आनंद किंवा दुःख या भागामुळे पुन्हा जिवंत होते.

मेंदूचा 'प्रीफ्रंटल कॉर्टेक्स' (Prefrontal Cortex) हा भाग संगीताची लय आणि आठवणी यांची सांगड घालतो. म्हणूनच गाणे ऐकताच आपण त्या काळात, त्या व्यक्तीसोबत किंवा त्या जागेवर पोहोचल्याचा भास होतो.

शास्त्रज्ञांच्या मते, संगीत हे मेंदूसाठी 'व्यायाम' आहे. इतर माहितीच्या तुलनेत गाणी मेंदूमध्ये अधिक खोलवर आणि दीर्घकाळ साठवली जातात.

गाणी ऐकल्याने शरीरातील 'कॉर्टिसोल' (Stress Hormone) कमी होते. तसेच 'ऑक्सिटोसिन' (Oxytocin) नावाचे रसायन स्त्रवते, ज्यामुळे आपल्याला सुरक्षित आणि निवांत वाटते.

संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मेंदूला पुनरुज्जीवित करणारे एक प्रभावी औषध आहे.