Multani Mitti for Hair Fall : पावसाळ्यातील केस गळती आणि कोंड्यावर 'मुलतानी माती' रामबाण उपाय

पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू होताच कोंडा (डँड्रफ) आणि केस गळतीचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढतो.

महागडे केमिकल हेअर प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा शतकानुशतके उपयुक्त ठरलेली 'मुलतानी माती' वापरणे फायदेशीर ठरते.

मुलतानी माती हे एक नैसर्गिक क्लींजर असून, ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केसांच्या समस्या मुळापासून नष्ट करते.

मुलतानी माती डोक्याच्या त्वचेवर (स्कॅल्प) साचलेली धूळ, प्रदूषण आणि अतिरिक्त तेल खोलवर जाऊन स्वच्छ करते.

यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे स्कॅल्पवरील इन्फेक्शन कमी होते आणि कोंड्यापासून आराम मिळतो.

हे कोरड्या आणि निर्जीव केसांना मऊ, चमकदार आणि रेशमी बनवते. आठवड्यातून १-२ वेळा याचा वापर करता येतो.

मुलतानी मातीचा स्वभाव शोषक असतो. त्यामुळे ती थेट लावल्यास केस कोरडे पडू शकतात, म्हणून नेहमी हेअर पॅक करूनच लावावी.

३ चमचे मुलतानी माती, २ चमचे लिंबाचा रस आणि गुलाबपाणी एकत्र करून अर्धा तास केसांना लावा आणि फरक पहा.

३ चमचे मुलतानी माती, ४ चमचे आंबट दही आणि १ चमचा मध एकत्र करून केसांना लावा. २५ मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.