अंजली राऊत
या फळाला अंबुर, सेतूर, तुतीचे फळ, चितरंग, शहतूत, कनंदळ, सैतुकाच फळ, सैतुल, आंबोली अशी विविध नावे असून नांदेडमध्ये या फळाला मुंग्या किंवा मुंगळे म्हणतात.
तुतीची फळे ही दिसायला ब्लॅकबेरीसारखी असून चवीला द्राक्षाप्रमाणे लागतात. नाशिक येथे अंजनेरीला ही फळे भरपूर दिसतात.
तुती फळांच्या सेवनामुळे अन्न पचनाचर प्रक्रिया सुलभ होऊन बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि पोटात पेटके अशा समस्या दूर होण्यास मदत होते.
तुतीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्व 'क', कॅल्शिअम आणि लोह असते. लोहामुळे लाल रक्तपेशी निर्मितीस प्रोत्साहन मिळते.
पांढऱ्या रंगाच्या तुतीमध्ये असलेली काही रसायने 'टाइप-2 मधुमेहा' वर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसारखी असतात.
तुम्हाला जर सतत फ्लूचा त्रास होत असेल तर पांढरी तुती ही फ्लू आणि सर्दीपासून बचाव करते.
तुतीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करते आणि सुरकुत्या कमी करते.
तुतीमध्ये ॲन्थोसायनिन्स नावाचे घटक असतात, जे कर्करोगाच्या पेशींना दूर ठेवण्यास मदत करतात
तुतीचे जास्त सेवन केल्यास काहींना पोटदुखी किंवा अतिसार होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणातच खाल्लेलं बरे!