Namdev Gharal
अशी एक बकरी आहे जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणलाही मात देते असे म्हटले तर वावगे ठरु नये कारण ही बकरी अशा खड्या व प्लेन कड्यांवर चढते की बघताना काळजात धस्स होते
९० अंश कोनातील दगडी कड्यावर लिलया चढणारी ही बकरी म्हणजे माऊंटेन गोट, इतक्या सहजपणे ही डोंगरावर चढते व चालते ते पाहून ग्रॅव्हीटी आहे की नाही असेच वाटते
ही बकरी अशा ठिकाणी चढते की एक पाय चुकीचा पडला तर थेट मृत्यू पण तरीही इतक्या जीवाचा धोका पत्करुन ही एक खनिज चाटण्यासाठी तिथपर्यंत चढते, निसर्गानेच त्यांना जन्मजात क्लायबिंग स्किल दिलेले असते
हे कपारीत झिरपणारे मीठ किंवा क्षार त्यांच्यासाठी खजिना असते, पोषक तत्वाने भरलेले हे क्षार चाटण्यासाठी त्या एवढ्या उंचावर जात असतात
त्यांचा आहार केवळ वाळलेले गवत असेत त्यामुळे त्यांना आवश्यक पोषक तत्वे मिळवण्यासाठी कड्यावरील क्षार खाण्यासाठी गिर्यारोहण करावे लागते
सर्वात रंजक बाब म्हणजे, नावामध्ये 'गोट' (Goat) असले तरी शास्त्रीयदृष्ट्या या शेळ्यांच्या प्रजातीतील नाहीत. त्या 'रॉक ड्वेलिंग अँटीलोप' म्हणजे काळवीट किंवा मृग जातीशी जास्त जवळच्या आहेत.
माउंटन गोटची पिल्ले (Kids) जन्माला आल्यानंतर अवघ्या २० ते ३० मिनिटांत उभी राहतात आणि काही तासांतच आपल्या आईसोबत अत्यंत अवघड कड्यांवर चढू लागतात.
हे प्राणी उभ्या कड्यावर एका जागेवरून दुसऱ्या जागी १२ फूट लांब उडी मारू शकतात. इतकेच नाही तर धावताना ते अचानक हवेत ९० अंशात वळू शकतात,
त्यांच्या गिर्यारोहणाच्या स्किलमुळे शिकारी प्राणी (जसे की लांडगे किंवा अस्वल) यांनाही त्यांची शिकार करणे खूप अवघड असते.
त्यांचे खूर दोन भागात विभागलेले असतात. हे दोन्ही भाग स्वतंत्रपणे हलू शकतात, ज्यामुळे खडबडीत जमिनीवर किंवा अरुंद दगडावर त्यांची पकड घट्ट बसते.
त्यांच्या पायाच्या मागच्या बाजूला असलेले छोटे नखे उतरताना ब्रेक लावण्यासारखे काम करतात, ज्यामुळे त्या वेगाने खाली उतरतानाही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात.