रणजित गायकवाड
सुनील नारायणने पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक विकेट घेण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी नारायणने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 29 धावांमध्ये 3 बळी घेतले.
यासह आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना नारायणच्या खात्यात 208 विकेट जमा झाल्या.
सुनील नारायणने समीत पटेलच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.
नारायण आणि पटेल असे गोलंदाज आहेत ज्यांनी पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून खेळताना 200 हून अधिक बळी मिळवण्याची किमया केली आहे.
नारायणने 208 पैकी 190 बळी हे आयपीएलच्या 186 सामन्यात मिळवले आहेत. तर 18 बळी केकेआरसाठी चँपियन्स लीग टी-20चे सामने खेळताना घेतले आहेत.
सुनील नारायणकडे समीत पटेलचा जागतिक विक्रम मोडण्याची संधी आहे. केवळ एक बळी घेऊन तो नवा इतिहास रचणार आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेताच तो नवीन जागतिक विक्रम नोंदवेल.
क्रिस वूडने हॅम्पशायरसाठी 199, मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी 195, डेव्हिड पायने ग्लूस्टरशर संघासाठी 193 विकेट्स मिळवल्या आहेत.