Most Unique Animal : अंडी घालतो अन् दूधही पाजतो! 'हा' अनोखा प्राणी पाहिलात का?

पुढारी वृत्तसेवा

या पृथ्वीवर निसर्गाने अनेक थक्क करणारे जीव निर्माण केले आहेत, पण 'प्लॅटिपस' (Platypus) हा प्राणी या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

हा प्राणी अंडीही घालतो अन् पिल्लांना दूधही पाजतो! पहिल्यांदा पाहून वैज्ञानिकही चक्रावून गेले होते.

प्लॅटिपसची चोच बदकासारखी, शेपटी बीव्हरसारखी सपाट आणि पाय उदमांजरासारखे पडद्याचे असतात. या रचनेमुळे तो पाण्यात अत्यंत वेगाने पोहू शकतो.

प्लॅटिपस हा सस्तन (Mammal) प्राणी असूनही थेट पिल्लांना जन्म न देता अंडी घालतो. मादी प्लॅटिपस एका वेळी २ ते ३ मऊ कवचाची अंडी घालते.

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे मादी प्लॅटिपसला स्तन नसतात. तिच्या पोटाच्या त्वचेवरील छिद्रांमधून दूध पाझरते आणि पिल्ले ते चाटून पितात.

प्लॅटिपस हा जगातील मोजक्या विषारी सस्तन प्राण्यांपैकी एक आहे. या प्राण्यामध्ये नराच्या मागच्या पायात विषारी नखे असतात, ज्याचा वापर तो स्वतःच्या संरक्षणासाठी करतो.

हा अनोखा प्राणी प्रामुख्याने पूर्व ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियामधील गोड्या पाण्याच्या नद्या आणि तलावांच्या भागात आढळून येतो.

प्लॅटिपस हा रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. अंधारात पाण्यात पोहत जाऊन आपले भक्ष्य शोधण्यात आणि शिकार करण्यात तो पटाईत आहे.

निसर्गाचे हे अजब रसायन असलेला प्लॅटिपस प्राणी साधारणपणे १० ते १५ वर्षे जगतो. त्याचे वैशिष्ट्यपूर्ण अवयव त्याला निसर्गात टिकून राहण्यास मदत करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.