WTC मध्ये ‘सिक्सर किंग’ कोण? टॉप-5 मध्ये 4 भारतीय

पुढारी वृत्तसेवा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर आहेत? जाणून घेऊया टॉप-५ खेळाडूंची यादी!

WTC मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांपैकी 4 खेळाडू हे केवळ भारतीय आहेत.

तरुण तडफदार यशस्वी जैस्वाल या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. त्याने केवळ २८ सामन्यांच्या ५३ डावांत ४३ षटकार ठोकले आहेत. सोबतच त्याने ३१२ चौकारही मारले आहेत.

भारतीय कर्णधार शुभमन गिल या यादीत चौथ्या स्थानी आहे. ४० टेस्ट सामन्यांच्या ७३ डावांत गिलने आपल्या बॅटमधून ४६ षटकार लगावले आहेत.

हिटमॅन रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहितने ४० सामन्यांच्या ६९ डावांत ५६ षटकार जडले आहेत.

भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतने ७१ डावांत ७७ षटकार ठोकले असून ३०२ चौकारही आपल्या नावावर केले आहेत.

WTC मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने ६२ सामन्यांच्या ११३ डावांत ८६ षटकार लगावले आहेत.

WTC मधील या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की, कसोटी क्रिकेटमध्ये आता फलंदाज बचावात्मक खेळाऐवजी षटकारांना अधिक पसंती देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.