Career Tips: २०२६ मध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 'या' कोर्सेसची मोठी क्रेझ

पुढारी वृत्तसेवा

२०२६ मध्ये १२ वीचे विद्यार्थी असे कोर्सेस निवडत आहेत ज्यामध्ये चांगला पगार, नोकरीची सुरक्षा, सर्जनशीलता आणि जागतिक स्तरावर संधी उपलब्ध असतील.

Career guidance | Canva Photo

विद्यार्थी पारंपारिक क्षेत्रांऐवजी भविष्यातील मागणी आणि कौशल्यांवर आधारित आधुनिक क्षेत्रांकडे वळत आहेत. विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सर्च केलेले टॉप कोर्सेस पाहा:

career guidance through aptitude test | Pudhari Canva

१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग

AI आणि मशीन लर्निंगचे कोर्सेस १२ वीनंतर विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहेत.

AI | Pudhari

२. डेटा सायन्स

तंत्रज्ञान आणि ॲनालिटिक्समध्ये रस असणाऱ्या आणि उच्च पगाराची नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांची या कोर्सला मोठी पसंती आहे.

३. डिजिटल मार्केटिंग

सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवसायांच्या वाढत्या प्रसारामुळे डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेसची मागणी खूप वाढली आहे.

४. हेल्थकेअर आणि वैद्यकीय क्षेत्र

MBBS, नर्सिंग आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित इतर कोर्सेसमध्ये देखील विद्यार्थ्यांनी मोठा रस दाखवला आहे.

५. बीबीए आणि मॅनेजमेंट

ज्या विद्यार्थ्यांना व्यवसायात किंवा कॉर्पोरेट जगतात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी BBA आणि मॅनेजमेंट कोर्सेस अजूनही टॉप लिस्टमध्ये आहेत.

६. कंप्यूटर सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग

तंत्रज्ञान क्षेत्रातील या पारंपरिक कोर्सेसचा दबदबा २०२६ मध्येही कायम आहे.

७. ग्राफिक डिझायनिंग आणि ॲनिमेशन

सर्जनशील आणि कलात्मक बुद्धी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या कोर्सेसची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

८. फायनान्स आणि सीए

आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित करिअरसाठी विद्यार्थी फायनान्स आणि चार्टर्ड अकाउंटन्सीचे कोर्सेस मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत.