Nail Polish: एका नेल पॉलिशची किंमत करोडो रुपये? यात असं काय आहे?

पुढारी वृत्तसेवा

आतापर्यंत तुम्ही महागड्या बॅग्स, घड्याळे आणि दागिन्यांबद्दल ऐकले असेल, पण कधी विचार केला आहे का की एखादी नेल पॉलिश सुद्धा करोडोंमध्ये असू शकते?

नेल आर्ट आता केवळ ग्रूमिंगपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते लक्झरी आणि स्टेटसचे प्रतीक बनले आहेत.

आज बाजारात हजारो प्रकारच्या नेल पॉलिश मिळतात, पण तुम्हाला माहिती आहे का की जगात अशी एक नेल पॉलिश आहे जिची किंमत करोडो रुपये आहे?

जगातील या सर्वात महागड्या नेल पॉलिशमध्ये खरे काळे हिरे जडलेले आहेत आणि याची किंमत एका आलिशान घराच्या, लक्झरी कार्सच्या आणि अनेक महागड्या दागिन्यांच्या बरोबरीची आहे.

या अनोख्या आणि अत्यंत महागड्या नेल पॉलिशचे नाव 'अझाचर ब्लॅक डायमंड नेल पॉलिश' असे आहे.

लॉस एंजेलिसचे प्रसिद्ध लक्झरी ज्वेलरी डिझायनर अझाचर पोगोसियन यांनी ती तयार केली आहे. त्यांना 'ब्लॅक डायमंड किंग' म्हणूनही ओळखले जाते.

ही नेल पॉलिश पहिल्यांदा २०१३ मध्ये चर्चेत आली, जेव्हा हॉलिवूड सेलिब्रिटी केली ऑस्बॉर्न हिने एका कार्यक्रमात याचा वापर केला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले.

त्यानंतर या नेल पॉलिशचा समावेश जगातील सर्वात महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये झाला.

या नेल पॉलिशच्या एका बाटलीमध्ये तब्बल २६७ कॅरेटचे काळे हिरे असतात.