Cat Breeds | अशी दुर्मिळ मांजरे कधी पाहिलीच नसाल, किंमतही असते लाखो रुपयांमध्ये!

Namdev Gharal

जगात मांजराच्या जवळपास ७५ प्रजाती सापडतात. यात अनेक प्रजाती या दुर्मिळ असून यापैकी काही प्रजाती या विक्रीस असतात व यांची किंमत लाखो रुपयांमध्ये असतात.

Scottish Fold (स्कॉटिश फोल्ड): कानाची कूर्चा दुमडलेली असल्यामुळे हिचे कान पुढच्या बाजूला झुकलेले आणि छोटे दिसतात.याची किंमत ३००० डॉलर्सपर्यंत जाते

Maine Coon (मेन कून): ही जगातील सर्वात मोठ्या आकाराची, लांबसडक गुबगुबीत शेपटीची आणि अतिशय लाघवी स्वभावाची मांजर आहे. याची किंमत ३५०० डॉलर्सपर्यंत असते

Russian Blue (रशियन ब्लू): हिचे किंमत हिचे मखमली चंदेरी-निळ्या रंगाचे केस आणि चमकदार हिरवे डोळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.किमंत ४००० डॉलर्स

Persian Cat (पर्शियन कॅट): हिचे गोल तोंड, चपटे नाक आणि अंगावरील लांब, मऊ केसांमुळे हिला राजाश्रय मिळाल्यासारखा राजेशाही थाट दिसतो. किंमत ५००० डॉलर्स

Bengal Cat (बेंगाल कॅट): घरगुती मांजर आणि आशियाई बिबट्याचा (Asian Leopard) संकर असलेली, अंगावर बिबट्यासारखे ठिपके असणारी ही एक देखणी प्रजाती आहे. किंमत ५००० डॉलर्स

Sphynx cat अंगावर एकही केस नसलेली आणि मऊ, सुरकुतलेली त्वचा असलेली ही जगातील अत्यंत आगळीवेगळी आणि ओळखायला सोपी अशी मांजराची प्रजाती आहे. किंमत ६००० डॉलर्स

Toyger Cat (टॉयगर कॅट): वाघासारखे हुबेहूब पट्टे असणारी, दिसायला एखाद्या 'छोट्या वाघासारखी' (Toy Tiger) वाटणारी ही मांजर अत्यंत खेळकर असते. किंमत १०००० डॉलर्स

Khao Manee (खाओ मणी): थायलंडमधील ही दुर्मिळ मांजर पांढरीशुभ्र असते आणि हिचे दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे (उदा. एक निळा आणि एक पिवळा) असू शकतात.किंमत १५००० डॉलर्स

Savannah Cat (सव्हाना कॅट): घरगुती मांजर आणि आफ्रिकन 'सर्व्हाल' (Serval) जंगली मांजराच्या संकरापासून बनलेली ही उंच आणि अत्यंत चपळ प्रजाती आहे. किंमत २५००० डॉलर्स

Ashera Cat (अशेरा कॅट): ही जगातील सर्वात महागडी आणि अत्यंत दुर्मिळ हायब्रिड मांजर असून, हिचा आकार आणि अंगावरील नक्षी बिबट्यासारखी थरारक दिसते. १२५००० डॉलर्स इतकी प्रचंड याची किंमत आहे.