पुढारी वृत्तसेवा
सिट्रोनेला (गवती चहा) यालाच आपण 'लेमनग्रास' म्हणतो. याचा सुगंध डासांना आवडत नाही. हे झाड तुम्ही कुंडीत किंवा जमिनीवर कुठेही लावू शकता.
तुळस ही केवळ औषधीच नाही, तर कीटकांना दूर ठेवणारी वनस्पती आहे. खिडकीत किंवा घराच्या बाहेर तुळस लावल्यास तिच्या वासामुळे डास आणि माश्या घरात येत नाहीत.
लेमन बामया झाडाचा वास लिंबासारखा असतो, जो डासांना दूर ठेवतो. अधिक फायद्यासाठी तुम्ही याची पाने हातावर चोळून त्याचा रस त्वचेला किंवा कपड्यांनाही लावू शकता.
लॅव्हेंडरचा सुगंध आपल्याला शांत करतो, पण डासांना मात्र तो अजिबात आवडत नाही. तुम्ही हे झाड बागेत लावू शकता किंवा घरामध्ये त्याचे तेल वापरू शकता.
पुदिन्याचा (पेपरमिंट) कडक वास डासांना पळवून लावतो. हा वास खूप लवकर पसरतो, म्हणून तो कुंडीत लावणे जास्त सोयीचे ठरते.
कॅटनीपया वनस्पतीमध्ये 'नेपेटालॅक्टोन' नावाचा घटक डासांना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. बागेत हे झाड लावणे किंवा त्याचे तेल फवारणे फायदेशीर ठरते.
सिट्रोनेलाचा सुगंध असलेल्या जिरेनियमच्या फुलांमुळे डास जवळ येत नाहीत. ही झाडे दिसायलाही सुंदर असतात आणि कुंडीत सहज वाढतात.
रोझमेरीचा वास डास आणि इतर कीटकांना लांब ठेवतो. हे झाड तुम्ही बागेत लावू शकता. याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो.