पुढारी वृत्तसेवा
जगात सौंदर्यासाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत; परंतु मोरोक्कोमधील चोऊआरा टॅनरी हे ठिकाण आपल्या विलक्षण दुर्गंधीसाठी ओळखले जाते.
फेझ शहरात स्थित ही 11 व्या शतकातील जगातील सर्वात जुनी चर्मोद्योग शाळा (टॅनरी) आहे.
येथे गाय, बकरी आणि उंटाच्या कातड्यावर प्रक्रिया करून त्यापासून चामडे बनवले जाते.
कातडे मऊ करण्यासाठी आजही कबुतराची विष्ठा आणि गायीचे मूत्र यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर होतो.
यामुळे येथे इतकी प्रचंड दुर्गंधी येते की, पर्यटकांना 5 मिनिटे उभे राहणेही कठीण होते.
ही दुर्गंधी कमी करण्यासाठी स्थानिक लोक पर्यटकांना पुदिन्याची पाने नाकाजवळ धरण्यासाठी देतात.
विचित्र दुर्गंधी असूनही, उंचावरून दिसणारे रंगीबेरंगी पाण्याचे कुंड पर्यटकांना आकर्षित करतात.
नैसर्गिक रंगांनी भरलेले हे कुंड एखाद्या इंद्रधनुष्यासारखे दिसतात. म्हणूनच, ही दुर्गंधी सहन करूनही दरवर्षी लाखो पर्यटक या ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरेला पाहण्यासाठी येथे गर्दी करतात.