Benefits Of Morning Exercise: दिवसभर राहाल उत्साही, जाणून 'मॉर्निंग वर्कआउट'चे फायदे!

पुढारी वृत्तसेवा

दिवसाची सुरुवात व्यायामाने करणे हे  शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते.

सकाळी लवकर व्यायाम केल्याने चयापचय क्रिया सुरळीत होते. दिवसभर अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते.

सकाळच्या व्यायामामुळे एंडॉर्फिन्स नावाचे आनंदी हार्मोन्स शरीरात स्रवतात. यामुळे  तणाव-चिंता कमी होते.

सकाळी लवकर केलेला व्यायाम एकाग्रता, कार्यक्षमतेत वाढ करतो. 

नियमित व्यायामाने रात्री गाढ झोप लागते.

दिवसाची सुरुवात व्यायामाने केल्‍यास दिवसभर येणारा थकवा कमी होतो. 

लवकर व्यायाम केल्याने भूकेवर नियंत्रण राहेत. अनाठायी खाण्याची इच्छा कमी होते.

कार्डिओ व्यायाम केल्यास रक्तदाब कमी होतो आणि संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते.

येथे क्‍लिक करा.