उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.शरीराला नकोसे असलेले पदार्थ पाण्यावाटेच बाहेर टाकले जातात.कमी पाणी पिणे शरीरातील किडनीवर परिणाम करते.किडनीचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी किती पाणी प्यावे याबाबत अनेक शंका आहेत.सामान्य व्यक्तीला साधारण 2 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.अनेकजण सकाळी जितके जास्त पाणी पिता येईल तितके पितात..पण सकाळी उठल्या उठल्या 2 लीटर पाणी पिल्याने किडनीवर दबाव येण्याची शक्यता जास्त आहे..त्यामुळे दिवसभरात थोडे थोडे करून 2 लीटर पाणी संपवावे.