पुढारी वृत्तसेवा
मोड आलेल्या मुगामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन भरपूर असतात. यामुळे शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते, ज्यामुळे दुपारपर्यंत थकवा जाणवत नाही आणि तुम्ही फ्रेश राहता.
अंकुरण प्रक्रियेमुळे मुगातील फायबरचे प्रमाण वाढते. हे पचन सुधारण्यास मदत करते आणि पोट साफ ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर मोड आलेले मूग हा एक उत्तम उपाय आहे. हे नैसर्गिकरित्या पोट साफ करण्यास मदत करतात.
अंकुरित केल्यामुळे मुगातील 'अँटी-न्यूट्रिएंट्स' कमी होतात. त्यामुळे हे खाल्ल्याने पोटात गॅस किंवा ब्लोटिंग (पोट फुगणे) होण्याचा त्रास होत नाही.
तुम्ही वेट लॉस प्लॅनवर असाल, तर हा एक उत्तम नाश्ता आहे. यात कॅलरी कमी आणि प्रोटीन-फायबर जास्त असल्याने, पोट जास्त वेळ भरलेले राहते.
जास्त प्रोटीन आणि फायबरमुळे हे खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही, परिणामी तुम्ही बाहेरचे अनहेल्दी स्नॅक्स खाणे टाळू शकता.
यात विटामिन 'सी' आणि भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून फ्री रेडिकल्सशी लढतात, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते आणि डाग कमी होतात.
यात असलेले विटामिन A, C आणि आयर्न शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. बदलते हवामान, सर्दी-खोकला यांसारख्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी हे रामबाण उपाय आहेत.