पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात सकाळी केल्या जाणाऱ्या पूजेला खूप महत्त्व आहे.
असा समज आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करते, तेव्हा तिच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा येते.
सकाळची पूजा केवळ घरात मांगल्याचे वातावरणच आणत नाही, तर ती आध्यात्मिक वाढ, प्रगती आणि आर्थिक समृद्धीशी देखील संबंधित आहे.
परंतु, पूजा नेहमी सर्व नियमांचे पालन करून केली पाहिजे.
या दरम्यान काही चुका करणे टाळले पाहिजे.
सकाळी पूजा करताना या पाच गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या घरात कायम सुख-शांती नांदेल.
देवासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करा. अस्वच्छ, मळलेले किंवा फाटलेले कपडे वापरल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते.
दिवा थेट जमिनीवर ठेवू नये. तो नेहमी चौरंग, पाट किंवा थाळीत ठेवावा. जमिनीवर दिवा ठेवणे अशुभ मानले जाते.
पूजेसाठी नेहमी अखंड तांदळाचा (अक्षतांचा) वापर करा. तुटलेले तांदूळ वापरल्याने त्याचे पावित्र्य नष्ट होते.
देवाला नेहमी ताजी फुलेच वाहा. शिळी किंवा सुकी फुले वापरणे अशुभ मानले जाते.
पूजेच्या वेळी एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका. असे करणे अशुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता, ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथ इत्यादींवर आधारित आहे.