पुढारी वृत्तसेवा
सकाळच्या काही गोष्टी या फक्त तुमचा दिवस कसा जाणार हे नाही तर तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचा असतो.
मात्र बरेच लोक असे असतात जे विचार न करता अशा गोष्टी अंगीकारतात ज्यामुळे हळूहळू तुमचे शरीर आणि चेहऱ्याचे वय वाढवते.
होय काही छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला कमी वयातच वृद्धावस्थेकडे नेतात. त्यामुळे हे जाणून घेणे आवश्यक आहेत या सकाळच्या सवई कोणत्या आहेत.
अशावेळी आम्ही तुम्हाला अशा 5 सवयी सांगतो, ज्या करण्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे.
नाष्टा न करण
अनेक लोक गडबडीत सकाळचा नाष्टा करणे टाळतात. त्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. आणि एनर्जी कमी होते. जास्त काळ असे केल्याने तुम्ही थकू शकता त्वचाही कोरडी-कोरडी होते.
सकाळी उठल्यावर फोन पाहणे
बरेच लोक सकाळी उठल्यावर पहिला फोनवर न्यूज, सोशल मीडिया, ई मेल चेक करतात. त्यामुळे मेंदू आणि मूड स्ट्रेस निर्माण होउ शकतो.
पाणी न पिताच कॉफी पिणे
रात्रभर झोपल्यानंर शरीर डिहायड्रेट असते. त्यामुळे शरीराला पाण्याची गरज असते. असे न करता बनेच लोक कॉफी-चहा पितात. जे शरीर आणि त्वचेसाठी चांगले नाही.
व्यायाम न करण
सकाळी स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम करण ब्लड शर्क्युलेशन होतं आणि मूड चांगला राहतो. सुर्यप्रकाश घेण हेही चांगले आहे. यामुळे शरीराचे घड्याळ सुव्यवस्थित राहते.
सकाळी घाईत असणे
गडबडीत असण्यामुळे स्ट्रेस हार्मोण्स वाढतात. यामुळे शरीर आणि मनावरही परिणाम होतो. हळूहळू तयारी करणे हे वय वाढण्याच्या प्रक्रियेला हळू करू शकते.