पुढारी वृत्तसेवा
रिकाम्या पोटी चहा पिणे का चुकीचे?
सकाळी पोट पूर्ण रिकामे असते. अशावेळी चहा घेतल्याने पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो.
अॅसिडीटी वाढण्याचा धोका
चहामधील कॅफिन आणि टॅनिन पोटातील आम्लाचे प्रमाण वाढवतात, त्यामुळे छातीत जळजळ व अॅसिडीटी होते.
पचनशक्ती कमजोर होते
रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पचनक्रिया मंदावते आणि अन्न नीट पचत नाही.
गॅस व पोटदुखीची तक्रार
चहा पिल्यानंतर अनेकांना गॅस, पोट फुगणे किंवा कळा येण्याची समस्या जाणवते.
लोह (Iron) शोषणात अडथळा
चहातील टॅनिनमुळे शरीरात लोह शोषले जात नाही, त्यामुळे अॅनिमियाचा धोका वाढतो.
तणाव व चिडचिड वाढू शकते
सकाळी कॅफिन घेतल्याने नर्व्हस सिस्टीमवर ताण येतो आणि चिडचिड वाढते.
शरीर डिहायड्रेट होते
चहा मूत्रल (diuretic) असल्याने शरीरातील पाणी कमी होते.
भूक कमी लागते
चहा पिल्याने भूक दाबली जाते, त्यामुळे नाश्ता टाळला जातो आणि कमजोरी येते.
सकाळी चहाऐवजी काय घ्यावे?
कोमट पाणी, लिंबूपाणी, भिजवलेले बदाम किंवा हलका नाश्ता अधिक फायदेशीर ठरतो.