Moringa side effects : शेवगा आहे सुपरफूड पण, ‘या’ लोकांनी टाळलेलाच बरा!

पुढारी वृत्तसेवा

शेवगा किंवा मोरींगा ही वनस्पती आर्युवेदात अतिशय गुणकारी सांगितली आहे. याचे अनेक फायदे असतात वात व कफ नाशक असते, आधुनिक वैद्यकशास्त्रात याला सुपरफूड म्हटले जाते

पण सर्वांनीच याचे सेवन करणे योग्य नसते हे ही आयुर्वेद सांगते आजकाल मोरिंगा पावडर, कॅप्सूल बाजारात मिळतात पण काही प्रकृतीच्या लोकांना शेवगा सुट होईलच असे नाही

शेवगा याची प्रवृत्ती उष्ण असते तसेच हा तिक्ष्ण गुणांनी भरपूर असते यामुळे काही प्रकृतीच्या लोकांनी याचे सेवन टाळावे किंवा मर्यादित करावे. कोणी कोणी हा टाळावा हे पाहू

शेवगा जरी वात व कफ शामक असला तरी तो पित्त वाढवणारा असतो त्‍यामुळे ज्या लोकांना हायपर ॲसिटीटी आहे, छातीत जळजळ होते त्‍यांनी शेवगा मर्यादित स्वरुपात सेवन करावा

ज्या लोकांना पिंपल्स येतात त्‍यांनी ही शेवग्याचे सेवन टाळावे कारण पिंपल्समधून रक्त येण्याची शक्यता असते

ज्या महिलांना मासिक पाळी लवकर येते, किंवा जास्त रक्तस्त्राव होतो अशा महिलांनी शेवग्याचे सेवन करु नये, उष्ण प्रकृती असल्यामुळे त्रास अधिक वाढतो

ज्या लोकांना मुळव्याध आहे व रक्तस्त्राव होताे अशांनी मोरींगा खाणे वर्ज्य करावे उष्ण प्रकृतीमुळे पाईल्सचा त्रास वाढू शकतो

गॅस्ट्रायटिक्सः ज्यांना वांरवार पोटफुगी, अतिसार, किंवा पोटाचे विकार आहेत त्‍यांनी शेवग्याचे सेवन कमी प्रमाणात करावे

प्रेग्नसी प्लॅन करणाऱ्या महिलांनी शेवगा खाऊ नये असे तज्ज्ञ सांगतात, गर्भाशय उत्तेजक असे गुण शेवग्यामध्ये असतात त्‍यामुळे यांनी सेवन टाळावे

स्तनदा माताः लहान मुलांना दुध पाजणाऱ्या स्तनदा मातांनी शेवग्याचे सेवन करणे टाळावे किंवा यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो