Moong : मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी मूग फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Asit Banage

मुगामध्ये प्रथिने असतात, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते.

मुगातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.

मुगातील प्रथिने आणि फायबरमुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

शिजवलेले मूग संतुलित आहारात कमी कॅलरीजचा पौष्टिक पर्याय ठरतात.

मुगाचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्याने रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी मदत होऊ शकते.

सकाळच्या नाश्त्यात मोड आलेल्या हिरव्या मुगांचा समावेश करता येतो.

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात पिवळी मूग डाळ किंवा मुगाची उसळ खाऊ शकता.

केवळ मूग खाल्ल्याने वजन कमी होत नाही. योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोपही महत्त्वाची आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...