पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात त्वचा नेहमी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.
ओले कपडे जास्त वेळ घालू नका, यामुळे बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) होऊ शकतो.
पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने अंघोळ करा.
सुती आणि सैल कपड्यांचा वापर करा जेणेकरून त्वचेला हवा लागेल.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा अँटीसेप्टिक लिक्विडचा वापर करा.
वैयक्तिक वस्तू जसे की टॉवेल, साबण किंवा कपडे कोणाशीही शेअर करू नका.
त्वचेला ओलावा देण्यासाठी हलक्या मॉइश्चरायझरचा वापर करा.
त्वचेवर जास्त खाज किंवा रॅशेस आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.