Namdev Gharal
सध्या पावसाळा सुरु झाला असून नदी, ओढ्या काठी भाताच्या शेतीत खेकड्यांचा वावर वाढला आहे. याच दिवसात मोठ्या प्रमाणात खेकडे बाहेर पडतात व खवय्यांसाठी ही एक पर्वणी असते
पावसाळी वातावरणात खेकडा खाल्ल्यावर सर्दी खोकला पळून जातो असे का म्हणतात हे खरे आहे का पाहू तसचे शरीराला ऊब देण्यासोबतच आरोग्यासाठी खेकडा खाणे खूप फायदेशीर ठरतो का हेही पाहू
खेकड्याचा गुणधर्म उष्ण मानला जातो. पावसाळ्यात हवेत गारवा असतो, अशा वेळी खेकड्याचे सूप किंवा रस्सा (कालवण) प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि छातीतील कफ कमी होतो.
दुसरी गोष्ट म्हणजे खेकड्यामध्ये झिंक (Zinc) आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण चांगले असते. पावसाळ्यात होणारे सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारखे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी हे घटक मदत करतात.
उच्च दर्जाचे प्रोटीन : खेकड्याच्या मासांमध्ये फॅट्स खूप कमी असतात आणि प्रोटीन भरपूर असते. त्यामुळे स्नायू मजबूत होण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड (Omega-3 Fatty Acids) मुबलक प्रमाणात असते. हे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
खेकड्याच्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळते, जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
खेकडे हे पावसाळ्यात खेकडे मुबलक प्रमाणात मिळतात याचे कारण नैसर्गिक आहे : पावसाळा हा खेकड्यांचा मुख्य प्रजननाचा काळ असतो. या दिवसांत मादी खेकडे अंडी घालण्यासाठी आणि नर खेकडे जोडीदाराच्या शोधात बिळातून बाहेर पडतात.
उन्हाळ्यात खेकडे जमिनीच्या आत खोल बिळे करून राहतात. पाऊस सुरू झाला की या बिळांमध्ये पाणी भरते, ज्यामुळे श्वास घेण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी त्यांना बिळाबाहेर पडावेच लागते.
पावसाळ्यात शेतात, ओढ्यांमध्ये आणि नद्यांमध्ये नवीन पाणी येते. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठचे किंवा खाडीतील खेकडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येतात आणि सहज पकडता येतात.