बघता बघता गणपती बाप्पाचे आगमन अगदी समोरच येऊन ठेपले आहे.बाप्पाला आवडणाऱ्या वस्तूंच्या यादीत एक नाव वर आहे ते म्हणजे मोदक.मोदक आवडतो सगळ्यांना पण अनेकदा बनवताना झालेली चूक महागात पडू शकते. विशेषत: सारणाच्या बाबत.सारण बिघडले तर मोदकाची अगदी चव निघून जाते.विशेषत ते कडक झाल्यास मोदक फाटण्याचा धोका असतो.सारण मंद आचेवर ठेवून शिजवावे म्हणजे कडक होत नाही.त्यातूनही सारण कडक झाल्यास बाजूने थोडे थोडे तूप सोडावे.याशिवाय काही प्रमाणात दूध घालून सारणाचा कडकपणा कमी करता येणे शक्य आहे.खोबरे आणि गुळाचे प्रमाण समान ठेवून सारण केल्यास कडक होत नाही