Eye Care Tips: सतत मोबाईल बघून डोळे दुखतात? दृष्टी सुधारण्यासाठी हा उपाय करा

पुढारी वृत्तसेवा

मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे डोळे कमकुवत होणे, डोके जड होणे आणि सतत थकवा जाणवणे या समस्यांसाठी एक घरगुती उपाय करू शकता.

डॉक्टर दृष्टी सुधारण्यासाठी चष्मा वापरण्याचा सल्ला देतात, परंतु पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी हा अत्यंत गुणकारी उपाय आहे.

तयार करण्याची पद्धत

बादाम: सर्वप्रथम बादाम धुवून स्वच्छ पुसून घ्या. त्यातील ओलावा घालवण्यासाठी तव्यावर हलके भाजून घ्या.

Almonds | Pudhari

बडीशेप: बडीशेप देखील मंद आचेवर थोडी गरम करून घ्या. त्यानंतर समप्रमाणात बादाम, बडीशेप आणि खडीसाखर एकत्र करून त्याची बारीक पूड तयार करा.

Fennel Seeds | Canva

हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून ठेवावे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत हे मिश्रण घेतल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात.

Drink Milk at Night | pudhari

मेंदू आणि डोळ्यांच्या नसांना ताकद देण्यासाठी बादाम अत्यंत फायदेशीर ठरतात. बडीशेप डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते आणि पोटाला थंडावा देते.

मधुमेहाच्या रुग्णांनी हे मिश्रण घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, कारण खडीसाखरेमुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.