गणेश सोनवणे
मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत भाविकांनी गोदावरी नदीकाठी स्रानासाठी गर्दी केली होती.
प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरला आहे. त्याचप्रकारे नाशिकमध्ये आज जणू मिनी कुंभमेळा भरला होता.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणाऱ्या मुहूर्तावर गोदास्रान करण्याला प्राधान्य दिले जाते.
रामकुंडापासून दुतोंड्या मारुतीपर्यंत नदीच्या दोन्ही काठावर भाविकांच्या गर्दीने कुंभपर्वातील स्रानाची आठवण करून दिली.
मोठी वाहतुक कोंडी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
मकसंक्रांतीचा मुहुर्त साध मुंबई, कर्नाटक तसेच नाशिक शहर परिसरातील भाविकांनी गोदाकाठी पहाटे पासूनच स्रानासाठी गर्दी केली होती. (सर्व फोटो : हेमंत घोरपडे)