Milk Digestion: दूध पचत नाही... दोष दुधात नाही तर पिण्याच्या पद्धती असू शकतो

Anirudha Sankpal

अनेकांना वाटते की त्यांना 'लॅक्टोज इनटॉलरन्स' आहे, पण प्रत्यक्षात दूध पिण्याची वेळ, प्रमाण आणि चुकीचे पदार्थ एकत्र खाणे ही मुख्य समस्या असते.

जेवण झाल्याबरोबर लगेच दूध पिणे टाळावे; जेवण आणि दूध यामध्ये किमान २ तासांचे अंतर असणे पचनासाठी आवश्यक आहे.

दुधासोबत खारट (मीठ असलेले) किंवा आंबट पदार्थ कधीही खाऊ नका, कारण हे 'विरुद्ध आहार' मानले जातात आणि शरीरात विषारी घटक निर्माण करतात.

रात्री खूप जड जेवण केल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने पोट फुगणे, गॅस आणि सुस्ती येण्यासारखे त्रास जाणवू शकतात.

फ्रिजमधील थंड दूध घटाघटा पिण्याऐवजी नेहमी कोमट किंवा गरम दूध घोट-घोट पिण्याची सवय लावा.

दूध पचायला हलके व्हावे यासाठी त्यात चिमूटभर हळद, जायफल किंवा सुंठ पावडर टाकून घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला दूध प्यायल्यावर जडपणा जाणवत असेल, तर ते कमी प्रमाणात घ्या आणि हळूहळू सवय वाढवा.

आयुर्वेद दुधाला 'अमृत' मानतो, पण ते चुकीच्या संयोगाने घेतल्यास शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

प्रत्येक वेळी दूध आरोग्याला घातक नसते, तर आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धतीच पचनसंस्थेत अडथळा निर्माण करतात.

येथे क्लिक करा