Mental Health Awareness | मानसिक आरोग्य निरोगी ठेवायच आहे? काही गोष्टी आवर्जून पाळा!

Namdev Gharal

आजच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव प्रचंड वाढले आहेत. असे ताणतणाव कमी करण्यासाठी आणि मन प्रसन्न व निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय नक्कीच मदत करू शकतील

नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, झोप सुधारते आणि ताणतणावाचे नियोजन करणे सोपे जाते.

तुम्हाला आनंद देणाऱ्या छंदांमध्ये किंवा इतर उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. पुस्तक वाचने, चित्रपट पाहणे, इत्‍यादी गोष्टी तुम्हाला करता येतील

मोबाईलमधून वेळ काढून कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत ठराविक वेळ घालवा. यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळते, एकाग्रता वाढते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. हे मनशांतीसाठी खूप उपयुक्त आहे

कोणत्याही कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आणि समस्यांचा सामना करण्यासाठी स्वतःमध्ये लवचिकता ठेवा, परिस्थितीची जाणीव ठेवा आणि आत्मविश्वास निर्माण करा.

योग्य प्रमाणात विश्रांती घेतल्याने एकाग्रता सुधारते. निरोगी आणि शांत मनःस्थितीसाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे.

व्यसनांचे प्रमाण कमी केल्याने किंवा ते पूर्णपणे टाळल्याने मन शांत आणि विचारांमध्ये स्पष्टता राहण्यास मदत होते.