Mental Health : ओव्हरथिंकिंग थांबवा; ५००० वर्ष जुन्या रहस्याने मिळवा मानसिक शांती!

पुढारी वृत्तसेवा

आजच्या धावपळीचे जीवन: मनातील अशांतता

आधुनिक जीवनशैलीत धावपळ, स्पर्धा आणि यशाच्या मागे धावताना मानवी मन अनेकदा विचलित होते. आपल्याच आत एक न संपणारा संघर्ष सुरू असतो.

अतिविचारांचे ओझे (Overthinking)

दिवसा कामामुळे शारीरिकरित्या थकूनही, रात्री डोळे मिटले की मन 'ओव्हरथिंकिंग'च्या (अतिविचार) रेसचा घोडा बनून धावू लागते.

५ हजार वर्षांपूर्वीचे रहस्य: मुंडकोपनिषद

आजचे मानसशास्त्र ज्या समस्यांवर उपाय शोधत आहे, त्याचे उत्तर भारतीय ऋषीमुनींनी पाच हजार वर्षांपूर्वीच 'मुंडकोपनिषदा'त देऊन ठेवले आहे.

दोन पक्ष्यांचे प्राचीन रूपक

एकाच शरीररूपी वृक्षावर दोन सुंदर पक्षी बसले आहेत – एक फळे खाण्यात मग्न, तर दुसरा केवळ शांतपणे पाहत आहे.

फळ खाणारा पक्षी: मन आणि अहंकार

हा पक्षी आपले 'मन' आणि 'अहंकार' दर्शवतो, जे सतत सुख-दुःख आणि अनुभवांच्या मागे धावते.

पाहणारा पक्षी: स्व-रूप आणि चैतन्य

हा शांत पक्षी आपले 'स्व-रूप' किंवा 'चैतन्य' आहे, जे जगाच्या कोलाहलापासून अलिप्त राहून केवळ साक्षीदार असते. यालाच 'मेटाकॉग्निशन' म्हणतात.

प्रतिक्रियेकडून निरीक्षणाकडे: आयुष्याचा टर्निंग पॉईंट

जेव्हा आपण 'पाहणारा पक्षी' बनायला शिकतो, तेव्हा आयुष्याचा ताबा आपल्या हातात येतो. ही स्थिती मानसिक शांतीकडे घेऊन जाते.

'साक्षीभावा'चे तीन सोपे टप्पे

ओळख (Notice) : मनात नकारात्मक विचार किंवा भावना ओळखा.

अलिप्तता (Detach) : "मी हा विचार नाही, मी केवळ निरीक्षक आहे," असे स्वतःला सांगा.

केवळ पाहणे (Observe) : आकाशातील ढगांप्रमाणे विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या, त्यावर प्रतिक्रिया देऊ नका.

रागावर नियंत्रण आणि एकाग्रता वाढवणे

'साक्षीभावा'चा सराव केल्याने रागावर नियंत्रण मिळवता येते आणि परीक्षेतील भीतीसारख्या स्थितीतही एकाग्रता वाढते.

आंतरिक शांतीचा मार्ग

त्रास हा परिस्थितीत नसून, त्या परिस्थितीला चिकटून राहण्याच्या आपल्या वृत्तीत असतो. 'साक्षीदार' बनण्याची निवड करून आपण आंतरिक शांती मिळवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.