Male Health Habits: पुरूषांनी या ८ आरोग्यदायी सवयी लावून घेतल्याच पाहिजे

Anirudha Sankpal

सकाळचे कोवळे ऊन

सकाळी उन्हात बसल्याने टेस्टोस्टेरॉन संप्रेरक (Testosterone) नियंत्रित होते, मूड सुधारतो, व्हिटॅमिन डी मिळते आणि शरीराचे जैविक घड्याळ (Circadian Rhythm) सुधारते.

गाढ झोप

दररोज ७ ते ९ तासांची दर्जेदार झोप घेतल्याने टेस्टोस्टेरॉन वाढते, शरीराची झीज भरून निघते (Recovery) आणि मेंदूचे आरोग्य उत्तम राहते.

Sleeping On Floor Benefits

स्ट्रेंथ ट्रेनिंग (व्यायाम)

वजने उचलून व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात, टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते, हाडांची घनता सुधारते आणि चयापचय (Metabolic) आरोग्य चांगले राहते.

नाकाने श्वास घेणे

तोंडाऐवजी नाकाने श्वास घेतल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो, मानसिक ताण कमी होतो आणि नायट्रिक ऑक्साईडच्या निर्मितीला मदत होते.

चालणे

नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण (Circulation) सुधारते, ताणतणाव कमी होतो, तसेच हृदय आणि प्रोस्टेटचे (Prostate) आरोग्य सुरक्षित राहते.

Walking benefits | canva photo

ध्यान (Meditation)

रोज ध्यान केल्याने कोर्टिसोल (Cortisol) या ताण वाढवणाऱ्या संप्रेरकाची पातळी कमी होते, चिंता दूर होते आणि एकाग्रता व मानसिक स्पष्टता वाढते.

Meditation For Beginners. | Canva

भरपूर पाणी पिणे (Hydration)

शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखल्यास टेस्टोस्टेरॉनची निर्मिती वाढते, रक्ताभिसरण चांगले होते, मूत्रपिंडाचे (Kidney) कार्य सुधारते आणि ऊर्जा मिळते.

Drinking Water | Pudhari

कार्डिओ व्यायाम

धावणे, सायकल चालवणे यांसारख्या कार्डिओ व्यायामांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, शारीरिक स्टॅमिना, रक्ताचा प्रवाह आणि कार्यक्षमता (Endurance) वाढते.

येथे क्लिक करा