पुढारी वृत्तसेवा
वातावरणातील बदल, चुकीच्या जीवनशैलीमुळे केस गळतात.
प्रदूषणामुळे विषारी घटकांचा वाईट परिणाम केसांवर होतो. यामुळे केस गळतात. केसात कोंडा होतो.
महिलांप्रमाणे पुरूषांनाही केसांच्या समस्या जाणवतात. पुरूषांकडून साबणाने केस धुणे, जेल लावणे अशा सवयींमुळे केसांचे नुकसान होते.
हेअर सीरम वापरा : केसांची काळजी घेण्यासाठी पुरूष उत्तम हेअर सीरम वापरू शकतात.
रोज केस धुणे टाळा : रोज केस धुण्यापेक्षा दोन ते तीन दिवसांतून एकदा केस धुता येतील.
केसांना नियमित तेल लावा : केसांच्या पोषणासाठी आणि आरोग्यासाठी तेलाचा वापर आवश्यक पण ते काही वेळाने स्वच्छ धुणे ही महत्वाचे.
योग्य शॅम्पूची निवड : केसांच्या समस्येनुसार योग्य शॅम्पूची निवड करा. यामुळे केसांची स्वच्छता आणि आरोग्य नीट राहील.
हेअर ड्रायरचा वापर : केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर शक्यतो टाळा. यामुळे केसांचे नुकसान होते.