मराठी मालिकाविश्वात आता लग्नसराईचा सीझनही सुरू झाला आहे..अशातच आणखी एका गोड जोडीने त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांशी शेयर केली आहे.अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांनी नुकतीच आपल्या नात्याची घोषणा सोशल मिडियावर केली आहे..ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.सोशल मिडियावर हातात अंगठी घातलेला फोटोही शेयर केला आहे..या दोघांची भेट रंग माझा वेगळा मालिकेदरम्यान झाली आहे..सध्या मेघन लक्ष्मी निवास या मालिकेत दिसतो आहे.तर अनुष्का लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दिसते आहे.