सणासुदीच्या खास दिवसांसाठी तुम्हीही साऊथ इंडियन लूक करायच्या विचारात आहात का?.अभिनेत्री मयूरी देशमुखने नुकत्याच शेयर केलेल्या फोटोंमध्ये साऊथ लूक छान कॅरी केला आहे.तुम्हाला ही असा लूक हवा असेल तर सुरुवात साडीच्या निवडीपासून करा.साऊथच्या मोठ्या काठाच्या साड्यांनी परिपूर्ण लूक मिळेल.यानंतर महत्त्वाची असते मुकुथी. म्हणजेच आपल्या भाषेत नोज पिन .या लूक मध्ये तुम्ही केस मोकळे ठेवू शकता किंवा वेणी घालू शकता, पण गजरा त्यावर हवाच.कानातल्या झुमक्यांना यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे