पाकिस्तानातील महिला मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी ४ कोटींचा निधी

पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तान सध्या तीव आर्थिक संकट आणि महागाईच्या झळांनी त्रस्त आहे.

दरम्यान, पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याशी संबंधित एक निर्णय मोठ्या वादाचा विषय ठरला आहे.

मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपसाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या निर्णयामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या असलेल्या मरियम नवाज सध्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत.

त्यांच्या मेकअप आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील ‌‘प्रेझेन्स‌’साठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, हाच निधी माहितीमंत्री आजम जाहिद बुखारी यांच्यासाठीही मंजूर करण्यात आला आहे.

यासंदर्भातील सरकारी आदेशाची प्रत माध्यमांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.