पुढारी वृत्तसेवा
तुमच्या मनात किंवा विचारात असलेली एखादी गोष्ट भौतिक जगात किंवा वास्तवात आणणे म्हणजेच Manifestation
Manifestation हि संकल्पना Law Of Attraction वर आधारित आहे.
तुमची इच्छा अगदी स्पष्ट आणि निश्चित असावी लागते.
त्या इच्छेबद्दल तुमचे विचार आणि भावना नेहमी सकारात्मक असायला हव्यातकृती: केवळ विचार पुरेसे नाहीत, तर त्या दिशेने योग्य कृती करणेही आवश्यक आहे
केवळ विचार पुरेसे नाहीत, तर त्या दिशेने योग्य कृती करणेही आवश्यक आहे
तुम्हाला जी गोष्ट प्रत्यक्षात आणायची आहे, ती गोष्ट आत्ताच घडली आहे अशा प्रकारे तुमच्या डायरीत सविस्तर लिहा. त्यामुळे तुमच्या मेंदूला आणि भावनांना ती गोष्ट खरी असल्याची अनुमती मिळते.
डोळे बंद करून, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, ते दृश्य मनात पूर्णपणे पाहा. त्या वेळी तुम्हाला काय जाणवत आहे, कोणत्या भावना आहेत, याचा अनुभव घ्या. ही सर्वात शक्तिशाली पद्धत आहे, जी भावनांद्वारे तुमच्या इच्छेला ऊर्जा देते.
मी यशस्वी आहे" किंवा "माझे आरोग्य उत्तम आहे" अशा सकारात्मक वाक्यांची पुन्हा पुन्हा मनात किंवा मोठ्याने उजळणी करा.यामुळे तुमच्या नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतात.
तुमच्याकडे आत्ता जे काही आहे, त्याबद्दल दररोज देवाची/युनिव्हर्सची कृतज्ञता माना आणि लिहा. कृतज्ञतेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि युनिव्हर्स तुमच्यासाठी आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करते.
तुमची इच्छा एका लहान सकारात्मक वाक्यात रूपांतरित करा आणि ते वाक्य ५ दिवसांसाठी, दिवसातून ५५ वेळा लिहा.सातत्याने एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ती इच्छा लवकर प्रगट होते