पुढारी वृत्तसेवा
आंबा (फळ म्हणून) आणि आमरस (आंब्याचा गर काढून बनवलेला पदार्थ) दोन्ही चविष्ट असले तरी आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे फरक आहेत
संपूर्ण आंबा खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते, त्यापासून अनेक पोषक घटक मिळतात
आंब्यातील तंतुमय पदार्थ (फायबर) पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करतात आंबा खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे टळले जाते
पूर्ण आंब्यात व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन A, C आणि E मुबलक प्रमाणात मिळतात, नैसर्गिक साखर असल्याने अतिरिक्त साखर टाकावी लागत नाही
आंब्याच्या गरापासून आमरस तयार केला जातो. आमरस खायला मऊ आणि सहज पचणारा, उन्हाळ्यात ऊर्जा देणारा आणि लहान मुलं आणि वृद्धांसाठी खाण्यासाठी सहज असतो
आमरसात फायबर कमी प्रमाणात आढळतात, गर काढल्याने तंतू कमी होतात अनेकदा साखर/ गुळ घातल्याने कॅलरीज वाढतात.
आमरस जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असल्याने मधुमेही रूग्णांना खाताना काळजी घ्यावी लागते
आरोग्यदृ्ष्टया दररोज खाण्यासाठी आंबा चांगला मानला जातो, कधीतरी आनंदासाठी किंवा चवीने खाण्यासाठी आमरस उत्तम पर्याय ठरतो
आरोग्याच्या दृष्टीने आंबा खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण त्यात फायबर आणि नैसर्गिक पोषक घटक असतात. आमरस चविष्ट असला तरी तो मर्यादित खणे योग्य ठरते