Mango Pests and Diseases: आंबा मोहोरल्यानंतर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी?

पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल गावरान व केशर, हापूस आंब्याच्या बागेतील आंब्याची झाडे कुठे मोहराने तर कुठे कैऱ्यांनी बहरली आहेत.

यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने आंब्याची गोडी लवकरच चाखायला मिळणार आहे. तरीही आंब्याची रोगापासून काळजी घेण्यासाठी काय करावे पाहा.

तुडतुडे कीड नियंत्रणासाठी

पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मि.लि. प्रति १० लिटर पाणी

बोंगे फुटताना

लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.लि. प्रती १० लिटर पाणी

मोहर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत

इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी

भुरी रोग नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, ही माहिती कृषितज्ज्ञ वैभव जाधव यांनी दिली आहे.

फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये बागेतील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

ठिबक असले तरी पाटाने मोकळे पाणी दिल्यास बागेतील आर्द्रता वाढून तापमान कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे तापमानाच्या ताणामुळे गळणारी लहान फळे झाडावर टिकून राहतात.