Mandukaparni : तणाव व नैराश्य घालवणारी वनस्पती: मांडूकपर्णी

Namdev Gharal

मांडूकपर्णी एक अशी औषधी वनस्पती आहे जी कोणाला जास्त माहीती नाही, आजकाल प्रचंड ताणमुळे लोकांना झोप लागत नाही पण ही एक अशी वनसपती आहे जी या समस्येवर खूप फायदेशीर आहे

आर्युवेदातील ही एक प्रमुख औषधी असून ही स्मरणशक्ती आणि बुद्धिवर्धक मानली जाते ही मेंदूच्या पेशींना सक्रिय करून एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवते.

तणाव व नैराश्यमुक्ती: मज्जासंस्थेला शांत करून मानसिक ताण, चिंता आणि निद्रानाशावर मात करण्यास मदत करते.

त्वचेचे आरोग्य व अँटी-एजिंग: कोलेजनचे प्रमाण वाढवून जखमा लवकर भरून काढते आणि सुरकुत्या कमी करते.

रक्तभिसरण सुधारणे: शिरांमधील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास उपयुक्त.अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.

काही लोकांचा गैरसमज होतो की ही ब्राम्ही वनस्पती आहे, पण ब्राह्मी वेगळी दोन्हींमध्ये वनस्पतीशास्त्रदृष्ट्या मोठा फरक आहे

मांडूकपर्णी ही मांडूकपर्णी घृत या औषधी वनसपतीत वापरली जाते हे मेंदूचे विकार व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

मेध्य रसायन (Medhya Rasayana): मानसिक थकवा व एकाग्रतेसाठी दिला जाणारा अर्क. फेफरे (Epilepsy) व मज्जासंस्थेच्या तक्रारींवर वापरल्या जाणऱ्या औषधांमध्ये ही वापरली जाते.

आयुर्वेदिक हेअर ऑईल व शॅम्पू: केस गळणे थांबवण्यासाठी व मुळांना पोषण देण्यासाठी. जखमा भरण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी औषधे तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो

तलावांच्या काठावर, ओढ्यांच्या कडेला, भाताच्या शेतांमध्ये आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात जमिनीवर पसरलेली वेलीसारखी ही वनस्पती दिसते. ?

रोज सकाळी रिकाम्या पोटी ३ ते ५ ताजी स्वच्छ धुतलेली पाने चावून खाऊ शकता किंवा तुळशीच्या पानांप्रमाणे पाण्यात उकळून चहा बनवून पिता येतो.