Man - Pupu-Ner rock : रशियामधील रहस्यमय दगड, एलिएन्सनी उभे केले आहेत की? निसर्गाचे एक रूप

Namdev Gharal

रशियाच्या कोमी रिपब्लीक ऑफ रशिया या ठिकाणी अतिशय दर्गम भागात सात उंच रहस्यमय दगड उभे आहेत. मानपुपुनर रॉक फॉर्मेशन्स असे याला म्हणतात

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हे खांब सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या एका उंच पर्वताचे अवशेष आहेत.

स्थानिक 'मानसी' जमातीच्या प्राचीन लोककथांनुसार, हे सात महाकाय राक्षस (Giants) होते. ते या भागात राहणाऱ्या मानसी लोकांवर हल्ला करण्यासाठी सायबेरियाच्या डोंगरातून आले होते.

हे खांब ज्या पद्धतीने उभे आहेत आणि ज्या दुर्गम भागात आहेत, तिथे माणसाला पोहोचणेही कठीण आहे. तसेच या खांबाचा आकार काही बाजूंनी मानवनिर्मित वाटतो त्‍यामुळे काही लोक हे एलिअन्सनी उभे केले आहेत असे मानतात

तर मानपुपुनरच्या या सात महाकाय दगडी खांबांना 'रशियाच्या सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक' म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यांची उंची ३० ते ४२ मीटर आहे.

वैज्ञानिकांच्या मते २०० दशलक्ष वर्षांचा इतिहास याला असून ऊन, वारा, पाऊस आणि बर्फाच्या सततच्या माऱ्यामुळे पर्वताचा मऊ भाग झिजून गेला आणि फक्त कठीण खडक उरले

सहा खांब एका रांगेत आहेत, तर सातवा खांब थोडा लांब उभा आहे. लोक या खांबांमध्ये कधी माणसाचा चेहरा, तर कधी घोड्याचे डोके पाहतात. यातील एकाला 'शमन’ म्हटले जाते.

हे ठिकाण इतक्या दुर्गम भागात आहे की तिथे पोहोचणे हे मोठे आव्हान आहे. तिथे जाण्यासाठी एकतर हेलिकॉप्टरचा वापर करावा लागतो किंवा कित्येक दिवसांची ट्रेकिंग करावी लागते.

हिवाळयात हे दगडी राक्षस पूर्णपणे बर्फाने झाकले जातात आणि एखाद्या काचेच्या पुतळ्यासारखे दिसतात.

तर उन्हाळयात आजूबाजूला हिरवेगार पठार आणि निळे आकाश यांच्यामध्ये हे खांब अधिकच उठावदार दिसतात.

अनेकांचा असा दावा आहे की या खांबांच्या जवळ गेल्यावर एक अनामिक शांतता किंवा काहीवेळा भीती वाटते. येथील दगड अधूनमधून विचित्र आवाजही करतात, ज्यामुळे या जागेचे गूढ अधिकच वाढते.