Maleo |असा पक्षी जो ज्वालामुखीच्या राखेत अंडी घालतो!

Namdev Gharal

निसर्ग अनेक पशू पक्ष्यांबाबत असे चमत्‍कार करत असतो की आश्चर्यचकीत व्हायला होते. यामध्ये 'मेलिओ' (Maleo) नावाचा पक्षी आहे जो आपले अंडे ज्वालामुखीच्या राखेत घालतो

हा पक्षी आढळतो इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर, 'मेलिओ' पक्षी इतर पक्ष्यांप्रमाणे घरटी बांधत नाही आणि स्वतः अंडी उबवतही नाही.

हे पक्षी आपली अंडी ज्वालामुखीच्या उष्ण मातीत किंवा राखेत पुरतात. जमिनीतील नैसर्गिक भूगर्भीय उष्णता अंड्यांना उबवण्याचे काम करते.

मेलिओचे अंडे सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा सुमारे ५ पट मोठे असते. हे अंडे खूप पोषक असते, ज्यामुळे बाहेर येणारा पिल्लू लगेच स्वतंत्र होतो.

अंडी जमिनीत पुरल्यानंतर पालक पक्षी तिथे पुन्हा कधीही येत नाहीत. पिल्लाला स्वतःच्या जीवावर जगण्यासाठी निसर्गाने आधीच तयार केलेले असते.

अंडी फुटल्यावर पिल्लू वाळूतून स्वतः खणून वर येते. बाहेर आल्याबरोबर हे पिल्लू उडू शकते आणि आपले अन्न स्वतः शोधू शकते!

वाळूतून बाहेर येण्याचा प्रवास पिल्लासाठी खूप कष्टदायक असतो. या काळात अनेकदा शिकारी पक्षी किंवा प्राण्यांचा त्यांना सामना करावा लागतो.

मानवी हस्तक्षेपामुळे आणि अंडी चोरल्यामुळे हा पक्षी सध्या 'धोक्यात असलेली' प्रजाती म्हणून गणला जात आहे.

विविध संस्था आणि स्थानिक लोक आता या पक्ष्यांच्या पैदास केंद्रांचे रक्षण करत आहेत, जेणेकरून हा निसर्गाचा चमत्कार टिकून राहील.